Indrajit bhalerao biography sample
भालेराव, इंद्रजित नारायण
ग्रामीण जीवनाचे अस्सल भावविश्व आपल्या कवितेतून व ललितलेखनातून साकारणारे सिद्धहस्त कवी, ललितलेखक. हिंगोली जिल्ह्याच्या वसमत-नगर तालुक्यातील रिधोरा या गावचे मूळ रहिवासी. वडील नारायणराव व आई रुख्मिणीबाई यांनी स्वतः अत्यंत खस्ता खाऊन, त्यांना शिकण्यासाठी बळ दिले. वसमतच्या बहिर्जी नाईक महाविद्यालयात महाविद्यालयीन शिक्षण व औरंगाबादच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात, मराठी विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. १९८२ साली बारावीत शिकत असतानाच बालमैत्रीचे अत्यंत प्रत्ययकारी दर्शन घडविणारा ‘हीरा’ हा लेख लिहून लेखनसेवेला प्रारंभ केला. सध्या परभणीच्या ज्ञानोपासक महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
विसाव्या शतकाच्या अखेरीस शिक्षणाच्या प्रसारामुळे, ग्रामीण युवामत सजग झाले. आपले जगणे शब्दांमधून अभिव्यक्त करण्याची ओढ त्यांना लागली. तशातच ग्रामीण साहित्य चळवळ उभी राहिली. विभागीय साहित्य संमेलनांनी या नव्या पिढीला विचारप्रवण केले आणि त्यातून अस्सल ग्रामीण कवितेचे अनेक लवलवते अंकुर उदयास आले. इंद्रजित भालेराव हे त्यांपैकी एक अत्यंत